नुकताच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या(बीसीसीआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या शशांक मनोहर यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या(आयसीसी) चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे.
आयसीसीमध्ये महत्त्वाचे पद मिळणार असल्याने बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे वृत्त मनोहर यांनी याआधी फेटाळून लावले होते. ‘सध्याच्या घडीला मला बीसीसीआयमध्ये काम करणे फार अवघड करून ठेवले होते. मला कोणाचेही नावे घ्यायची नाहीत. पण मी एवढे नक्कीच सांगू शकतो की, राजीनामा देण्यासाठी माझ्यावर दबाव वाढवण्यात आला होता,’ असे मनोहर यांनी सांगितले होते. मात्र, अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या दोनच दिवसांत मनोहर यांना आयसीसीमध्ये महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली. आयसीसीच्या चेअरमनपदी मनोहर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे माध्यमांमध्ये आलेले वृत्त अखेर ठरले आहे.
शशांक मनोहर यांनी ऑक्टोबर २०१५ मध्ये जगमोहन दालमिया यांच्या निधनानंतर बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारली. बीसीसीआयचे अध्यक्ष म्हणून हा त्याचा दुसरा काळ होता.