आयसीसीच्या अध्यक्षपदी भारताच्या शशांक मनोहर यांची पुन्हा एकदा बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत यासंदर्भात घोषणा करण्यात आली आहे. २०१६ साली शशांक यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड करण्यात आली होती, यानंतर अध्यक्षपदाची मनोहर यांची ही दुसरी टर्म असणार आहे.

“आयसीसीच्या अध्यक्षपदी फेरनिवड होणं हा माझ्यासाठी एकप्रकारे सन्मान आहे. माझ्या नावाला पाठींबा देणाऱ्या सर्व सदस्यांचे मी आभार मानतो आहे. २०१६ साली जी आश्वासन मी दिली होती, ती पूर्ण करण्यात काही अंशी यश आलं आहे. आगामी वर्षांमध्ये ही आश्वासनं पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.” फेरनिवडीनंतर शशांक मनोहर यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. आयसीसीच्या धोरणांमधून क्रिकेटचा प्रसार जगभर व्हावा हाच आपला प्रयत्न असल्याचं मनोहर यावेळी म्हणाले.