04 August 2020

News Flash

शशांक मनोहर यांचा ICC अध्यक्षपदाचा राजीनामा

चार वर्षांच्या कार्यकाळानंतर सोडला पदभार

शशांक मनोहर

ICC चे माळवते अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दोन वेळा दोन वर्षांचा कार्यकाळ सांभाळल्यानंतर अखेर बुधवारी ICC चे अध्यक्षपद सोडले. ICC ची बुधवारी बैठक झाली. त्यात असा निर्णय घेण्यात आला की नव्या अध्यक्षाची निवड होईपर्यंत ICC उपाध्यक्ष असलेले इम्रान ख्वाजा हे उत्तराधिकारी म्हणून परिषदेचा कारभार सांभाळतील. “ICC बोर्ड, कर्मचारी आणि संपूर्ण क्रिकेट परिवाराच्या वतीने मी शशांक मनोहर यांचे नेतृत्व आणि त्यांनी ICC चे अध्यक्ष म्हणून खेळासाठी दिलेले योगदान यासाठी त्यांचे आभार मानू इच्छितो. मी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो”, अशा शब्दात ICC चे मुख्य कार्यकारी मनु सावनीने यांनी शशांक मनोहर यांचे आभार मानले.

२०१६ मध्ये शशांक मनोहर हे ICC अध्यक्षपदी निवड झाले होते. त्यानंतर २०१८ मध्ये ते पुन्हा बिनविरोध निवडून आले. ६२ वर्षीय शशांक मनोहर हे २००८ ते २०११ या काळात BCCI चे प्रमुख होते. शशांक मनोहर हे जून महिन्यात पदावरून पायउतार होणार होते. मात्र करोनामुळे ICC च्या कार्यकारी मंडळाची बैठक लांबणीवर पडल्याने मनोहर यांना पुढील दोन महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे ऑगस्टपर्यंत मनोहर ICC च्या अध्यक्षपदी कायम राहणार होते, पण अखेर आज त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

शशांक मनोहर

‘‘सध्या जगभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून वार्षिक सर्वसाधारण सभा जून महिन्यात होणे सद्य:स्थितीत अशक्य वाटत आहे. त्यामुळे किमान दोन महिन्यांच्या कालावधीकरिता मनोहर हेच ‘आयसीसी’च्या अध्यक्षपदी राहणार आहेत. ऑगस्ट महिन्यात ‘आयसीसी’ला नवा अध्यक्ष मिळू शकेल,’’ असे ‘आयसीसी’च्या संचालक मंडळाच्या सदस्याने त्यावेळी सांगितले होते. अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेला येत्या आठवड्यात ICC कडून मान्यता मिळणे अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 7:59 pm

Web Title: shashank manohar steps down as icc chairman after four years vjb 91
Next Stories
1 ‘हे’ चालतं, मग धोनीच्या ‘त्या’ ग्लोव्ह्जला विरोध का केला?; नेटकरी ICC वर भडकले…
2 करोनापाठोपाठ आणखी एक व्हायरस; हरभजन चीनवर संतापला…
3 विराट करायला गेला राहुलला ट्रोल; मिळालं ‘हे’ उत्तर
Just Now!
X