11 August 2020

News Flash

‘आयसीसी’च्या कार्याध्यक्षपदावरून शशांक मनोहर पायउतार

हंगामी कार्याध्यक्ष म्हणून ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे जबाबदारी

संग्रहित छायाचित्र

शशांक मनोहर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्याध्यक्षपदावरून पायउतार झाले. मनोहर यांनी नोव्हेंबर २०१५ पासून ‘आयसीसी’ कार्याध्यक्षपद सांभाळले. हंगामी कार्याध्यक्ष म्हणून ‘आयसीसी’चे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.

मनोहर यांना ‘आयसीसी’च्या नियमांप्रमाणे पुन्हा दोन वर्षांसाठी कार्याध्यक्ष होता येऊ शकते. कारण तीन वेळा निवडून येण्याची संधी नियमांप्रमाणे आहे. अर्थातच ‘आयसीसी’च्या पुढील आठवडय़ात होणाऱ्या बैठकीत कार्याध्यक्षपदाची निवडणूक कधी आयोजित करायची याबाबतचा निर्णय होणार आहे. ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी मनोहर यांचे आभार मानले आहेत. ‘‘मनोहर यांनी आयसीसीचे कार्याध्यक्ष म्हणून जबाबदारी उत्तमपणे सांभाळल्याबद्दल त्यांचे आभारी आहोत,’’ असे साहनी यांनी सांगितले. ख्वाजा यांनीही मनोहर यांच्या कार्यपद्धतीबद्दल कौतुकोद्गार काढले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 2, 2020 12:14 am

Web Title: shashank manohar steps down as icc president abn 97
Next Stories
1 रवींद्र जडेजा भारताचा सर्वाधिक मौल्यवान कसोटीपटू
2 ला लिगा फुटबॉल : मेसीचे सप्तशतक; बार्सिलोनाला बरोबरीवर समाधान
3 सेरी ए फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोचा अप्रतिम गोल, युव्हेंटसचा सलग तिसरा विजय
Just Now!
X