News Flash

शॉन मार्श ऑस्ट्रेलियाच्या ट्वेन्टी-२० संघात

श्रीलंकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला असून या संघात शॉन मार्शला संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याचे संघात पुनरागमन

| January 22, 2013 12:13 pm

श्रीलंकेविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर झाला असून या संघात शॉन मार्शला संधी देण्यात आली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे त्याचे संघात पुनरागमन झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील पहिला ट्वेन्टी-२० सामना २६ जानेवारीला सिडनी आणि दुसरा ट्वेन्टी-२० सामना २८ जानेवारीला मेलबर्न येथे होणार आहे.
संघ : जॉर्ज बेली (कर्णधार), बेन कटिंग, झेव्हियर डोहर्टी, जेम्स फाऊल्कनर, अ‍ॅरॉन फिंच, बेन लाऊघलिन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, अ‍ॅडम व्होग्ज, मॅथ्यू वेड (यष्टिरक्षक) आणि डेव्हिड वॉर्नर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 12:13 pm

Web Title: shaun marsh is in austrelias t 20 team
टॅग : Austrelia,T 20
Next Stories
1 आंतर-आयटी क्रिकेट स्पर्धेत इन्फोसिसला विजेतेपद
2 पुजारा, रोहितला रणजीसाठी सोडणार नाही -बीसीसीआय
3 दिल्लीचे ‘दे दणादण!’
Just Now!
X