न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने 90 धावांनी सामना जिंकत 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. फलंदाजीत सलामीवीर रोहित शर्मा-शिखर धवन जोडीची फलंदाजी आणि गोलंदाजीत कुलदीप यादवचा भेदक मारा या जोरावर भारताने सामन्यात बाजी मारली. या सामन्यात शिखर धवन-रोहित शर्मा जोडीने पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. 66 धावांवर शिखर धवन ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर माघारी परतला. या खेळीदरम्यान शिखर धवनने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे.
अवश्य वाचा – ना ऑस्ट्रेलिया, ना इंग्लंड…16 वर्षीय नेपाळी खेळाडूने मोडला सचिनचा विक्रम !
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 हजार धावांचा टप्पा पार केला. डावखुऱ्या फलंदाजांच्या यादीत शिखर धवन हा टप्पा पार करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ब्रायन लारासोबत संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर पोहचला आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याने 126 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. शिखर धवनने 116 डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे. याआधीही शिखर धवनने सर्वात जलद 5 हजार धावांचा टप्पा पार करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसरं स्थान मिळवलं आहे.
अवश्य वाचा – IND vs NZ : गांगुली-धोनीला मागे टाकत ‘गब्बर’ने पटकावलं मानाचं स्थान
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 27, 2019 9:05 am