भारताचा सलामी फलंदाज शिखर धवनने युवराज सिंगने दिलेले चॅलेंज पूर्ण केलं आहे. शिखर धवनने ट्विट करत ही माहिती दिली. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झालेले ‘बॉटल कॅप चॅलेंज’ युलराजने शिखर धवनला दिलं होते. शिखर धवनने हे चॅलेंज स्वीकारत पूर्णही केलं आहे.

‘बॉटल कॅप चॅलेंज’ची भूरळ सेलिब्रिटींनाही पडली आहे. अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूडमधील दिग्गजांनी हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. यामध्ये आता युवराज-शिखरची भर पडली आहे. युवराजने ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पूर्ण करत सचिन तेंडुलकर, शिखर धवन, ख्रिस गेल आणि ब्रायन लारा यांना पूर्ण करण्याचे आवाहन केलं होते. यापैकी शिखर धवनने युवराजचे हे चॅलेंज पूर्ण केलं आहे.

शिखरने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये बॅटने चेंडू मारून बॉटलचे टोपन उडवले आहे. विश्वचषकादरम्यान झालेल्या दुखापतीमधून शिखर धवन सावरला आहे. दुखापतीनंतर शिखर धवन पहिल्यांदाच नेटमध्ये सरावाला आला.

दरम्यान, याआधी अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, कुणाल खेमू, गोविंदा, सिद्धार्थ चतुर्वेदी व विद्युत जामवाल यांनाही चॅलेंज पूर्ण केले आहे.

‘बॉटल कॅप चॅलेंज’ नेमकं आहे तरी काय?
यामध्ये आपल्या उंचीला समांतर अशी एक बॉटल समोर ठेवली जाते. त्यानंतर गोल फिरून पायाने त्या बॉटलचं झाकण उडवण्याचा प्रयत्न केला जातो. असं करताना ती बॉटल खाली पडली नाही पाहिजे.