News Flash

Video : बायकोचा राग घालवण्यासाठी धवनने केला डान्स, लेकालाही घेतलं सोबत

पाहा गब्बर आणि ज्युनियर धवनचा झकास अंदाज

करोनामुळे गेली चार महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट बंद होते. अखेरीस इंग्लंड – वेस्ट इंडिज क्रिकेट मालिकेने ते सुरू झाले. पहिली कसोटी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आणि त्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. पण भारतीय संघ मात्र अजूनही घरातच आहे. भारतीय संघातील खेळाडूंसाठी लावण्यात येणारे सराव आणि प्रशिक्षण शिबीर सध्या तरी आयोजित करण्यात येणार नाही, असे BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे. तसेच ऑगस्टपर्यंत नियोजित असलेले भारताचे क्रिकेट दौरेदेखील रद्द करण्यात आले आहेत. यादरम्यान भारताचा सलामीवीर शिखर धवन याने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.

धवन आपल्या घरात आपली पत्नी आणि मुलं यांच्यासोबत वेळ घालवतो आहे. त्याने याआधीही अनेकदा त्याच्या कुटुंबीयांसोबतचा व्हिडीओ शेअर केलेला आहे. पण यावेळी शेअर केलेला व्हिडीओ हा फारच वेगळा आहे. धवनची बायको काही कारणाने त्याच्यावर रूसली आहे. त्यामुळे तिचा रूसवा घालवण्यासाठी धवनने चक्का डान्स करून दाखवला आहे. इतकेच नव्हे तर त्याने डान्स करताना आपला मुलगा झोरावर यालाही साथीला घेतलं आहे. “बायकोचा राग घालवायचा असेल तर मुलाची साथ असणं आवश्यक आहे”, असे कॅप्शन लिहित त्याने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

Biwi ko manaane ke liye bete ki support lena bhi bada zaroori hai … Aaja nachle @aesha.dhawan5 # Gabbargyaan

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

शिखर धवनने याआधीही आपल्या मुलासोबत डान्स करतानाचा व्हिडीओ पोस्ट केला होता. शिखरने आपल्या मुलासोबत डॅडी कूल या बॉलिवूड गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ चाहत्यांना खूप पसंत पडला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2020 9:10 am

Web Title: shikhar dhawan dance with son to make wife aisha happy see video vjb 91
Next Stories
1 मँचेस्टर सिटीवरील बंदी उठली!
2 द्युतीचा ऑलिम्पिकसाठी आलिशान गाडी विकण्याचा निर्णय
3 ब्रॉडला वगळण्याचा निर्णय योग्यच -स्टोक्स
Just Now!
X