07 March 2021

News Flash

Video : भारताचा ‘गब्बर’ घरात करतोय धुणी-भांडी

सोशल मीडियावर पोस्ट केला व्हिडीओ

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या भारतीय क्रीडाविश्व ठप्प झालेलं आहे. बीसीसीआयसह अन्य महत्वाच्या संघटनांनी आपल्या स्पर्धा अनिश्चीत काळासाठी रद्द केल्या आहेत. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतीय संघातले खेळाडूही घरात राहुन आपल्या परिवारासोबत वेळ घालवणं पसंत करत आहेत. मात्र नेहमी मैदानावर लाखो चाहत्यांच्या गराड्यात असणाऱ्या खेळाडूंवर सध्या घरातली सर्व कामं करायची वेळ आलेली आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्याची बायको ही आरशासमोर मेकअप करताना दिसत आहे. तर शिखर हा कपडे आणि घरातलं कमोड साफ करत आहे. पाहा हा गमतीशीर व्हिडीओ…

याआधीही शिखरने सोशल मीडियावर आपले गमतीशीर व्हिडीओ पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या मुलांसोबत डोळ्यांवर पट्टी बांधून पिलो-फाईट करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, २९ मार्चपासून सुरु होणारी आयपीएल स्पर्धाही १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता बीसीसीआय आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता आहे. मध्यंतरी बीसीसीआय सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचं आयोजन करण्याचा विचार करत असल्याची बातमी समोर आली होती. मात्र आयसीसीचं कॅलेंडर पाहता हा पर्यायही उपलब्ध नसल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने स्पष्ट केलंय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 24, 2020 7:27 pm

Web Title: shikhar dhawan doing house work posted video on social media psd 91
Next Stories
1 करोनानं टोक्यो ऑलिम्पिकला लावला ब्रेक
2 पठाण बंधूंनी राखलं सामाजिक भान ! गरजूंना मोफत मास्कचं वाटप
3 CoronaVirus : जादूगार अय्यर ! होम क्वारंटाईन झालेल्या श्रेयसने जोपसली नवीन कला
Just Now!
X