News Flash

Video: शिखर धवनच्या बासरी वादनावर पृथ्वी शॉनं गायलं गाणं

शिखर धवनच्या बासरी वादनावर पृथ्वी शॉनं गाणं गायलं. हा व्हिडिओ शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

शिखर धवनच्या बासरी वादनावर पृथ्वी शॉनं गायलं गाणं (Photo- Shikhar Dhawan Instagram)

टीम इंडियाचा आघाडीचा फलंदाज शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांच्यात मैदानावर चांगलीच जुगलबंदी दिसून येते. आता मैदानाबाहेरही या जोडीनं अशीच जुगलबंदी जमवून आणली आहे. शिखर धवनच्या बासरी वादनावर पृथ्वी शॉनं गाणं गायलं. हा व्हिडिओ शिखर धवनने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओला काही तासातचं हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळाले आहेत. शिखर धवन आणि पृथ्वी शॉने एका जुन्या गाण्यावर आपलं टॅलेंट दाखवलं. शिखर धवन बासरी वाजवत आहे. तर पृथ्वी शॉ ‘ये शाम मस्तानी’ गाणं गात आहे.

हा व्हिडिओ शिखर धवनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केल्यानंतर खास शैलीत पोस्ट लिहिली आहे. “गुरुवारचं गाणं आपल्यासोबत गात आहेत, आमचे सुपस्टार गायक पृथ्वी शॉ..” असं कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवनला टीम इंडियाचा कर्णधार केलं आहे. तर पृथ्वी शॉने संघात पुनरागमन केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खराब कामगिरीमुळे त्याला टीममधून वगळण्यात आलं होतं. मात्र आयपीएलमधील चांगल्या प्रदर्शनामुळे त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ ही जोडी श्रीलंका दौऱ्यात आघाडीला फलंदाजी करण्याची शक्यता आहे. या जोडीने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्ससाठी चांगलं प्रदर्शन केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2021 8:24 pm

Web Title: shikhar dhawan play flute and prithvi shaw sing on music rmt 84
Next Stories
1 Video: इंग्लंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात झेल घेण्यावरून सरफराज अहमद आणि शदाब खान यांच्यात वाद
2 भारतीय संघात करोनाचा शिरकाव; ऋषभ पंतनंतर स्टाफ मेंबर करोनाबाधित
3 जाणून घ्या भारताचा ऑलिम्पिकमधील प्रवास!, १९०० ते २०१६ पर्यंत इतकी पदकं जिंकली
Just Now!
X