हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यरच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर ६ गडी राखून मात केली. भारतीय संघाकडे सध्या २-० अशी विजयी आघाडी आहे. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवननेही या सामन्यात महत्वपूर्ण खेळी करत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. लोकेश राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी ५६ तर विराट कोहलीसोबत ३९ धावांची भागीदारी करत शिखरने सुरुवातीपासून जलद गतीने धावा जमवण्यास सुरुवात केली होती.

५२ धावांची खेळी करुन धवन झॅम्पाच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र या अर्धशतकी खेळीदरम्यान शिखर धवनने महेंद्रसिंह धोनीचा विक्रम मोडला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत धवन आता तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय फलंदाज –

१) विराट कोहली – २ हजार ८४३ धावा

२) रोहित शर्मा – २ हजार ७७३ धावा

३) शिखर धवन – १ हजार ६४१ धावा

४) महेंद्रसिंह धोनी – १ हजार ६१७ धावा

५) सुरेश रैना – १ हजार ६०५ धावा

या मालिकेतला अखेरचा टी-२० सामना मंगळवारी खेळवला जाणार आहे. मालिका खिशात घातल्यामुळे भारतीय संघाला अखेरच्या सामन्यात प्रयोग करण्याची चांगली संधी आहे.

अवश्य वाचा – Video : श्रेयसचा तो षटकार पाहून विराट कोहलीही झाला अचंबित