News Flash

डावखुऱ्या फलंदाजांमध्ये ‘गब्बर’ ठरला उजवा, महत्वाच्या यादीत अव्वल स्थानी झेप

सुरेश रैनाचा विक्रम मोडला

सिडनीच्या मैदानावर रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांची धुलाई करत १९४ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल मैदानावर उतरलेल्या शिखर धवन आणि लोकेश राहुल या जोडीनेही धडाकेबाज फटकेबाजी करत पहिल्या षटकापासून आक्रमक सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी झाल्यानंतर अँड्रू टायने लोकेश राहुलला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला.

दरम्यान शिखर धवनने एक बाजू लावून धरत धावांचा ओघ सुरु ठेवला. यानिमीत्ताने शिखर धवन आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या डावखुऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत पहिल्या स्थानी गेला आहे. धवनने रैनाचा १६०५ धावांचा विक्रम मोडत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

सुरेश रैना, युवराज सिंह आणि गौतम गंभीर हे फलंदाज आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेले आहेत. त्यामुळे पुढचा काहीकाळ हे अव्वल स्थान आपल्याकडे कायम राखण्याची चांगली संधी शिखर धवनकडे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2020 4:25 pm

Web Title: shikhar dhawan tops the list of most t20i runs by indian left handed batsman psd 91
Next Stories
1 शेतकरीविरोधी काळे कायदे मागे घ्या नाहीतर खेलरत्न पुरस्कार परत करेन – विजेंदर सिंह
2 पहिल्या सामन्याचा हिरो, दुसऱ्या सामन्यात ठरला झिरो ! चहलच्या नावावर नकोसा विक्रम
3 चहलनं केली बुमराहाच्या विक्रमाची बरोबरी
Just Now!
X