News Flash

शिवा थापाला कांस्य

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिवा थापाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची आणखी एक संधी शिवाला मिळणार आहे.

जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या शिवा थापाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची आणखी एक संधी शिवाला मिळणार आहे. ५६ किलो वजनी गटातून खेळताना उझबेकिस्तानच्या मुरोजोन अखमाडालिव्हने शिवावर २-१ असा विजय मिळवला. या गटातून ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याची आणखी तीन बॉक्सिंगपटूंना संधी असल्याने शिवा ‘बॉक्स ऑफ’ लढतीत खेळणार आहे. ‘‘मी सर्वोत्तम प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुरेसे ठरले नाही. हा पराभव निराशाजनक आहे. मात्र रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याची मला अजूनही संधी आहे,’’ असे शिवाने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 12, 2015 6:29 am

Web Title: shiva thapa win bronze medal
टॅग : Medal
Next Stories
1 गैरसमजांमुळे खेळाच्या विकासाला खीळ
2 विश्वनाथन आनंदची पराभवाने सुरुवात
3 भारताचा हॉकीमध्ये मालिका विजय
Just Now!
X