21 September 2020

News Flash

भारत-द. आफ्रिका ‘अ’ क्रिकेट मालिका : भारत ‘अ’ संघाचे दुसऱ्या दिवसावरही वर्चस्व

साहा, शिवम यांचीही अर्धशतके; आफ्रिकेच्या पहिल्या डावात ५ बाद १५९ धावा

| September 19, 2019 03:33 am

शिवम दुबे

साहा, शिवम यांचीही अर्धशतके; आफ्रिकेच्या पहिल्या डावात ५ बाद १५९ धावा

म्हैसूर : पहिल्या दिवशी शुभमन गिल आणि करुण नायर यांनी अर्धशतके झळकावल्यानंतर बुधवारी मुंबईकर शिवम दुबे आणि कर्णधार वृद्धिमान साहा यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर भारत ‘अ’ संघाने दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या चारदिवसीय कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या डावात ४१७ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेची ५ बाद १५९ धावा अशी अवस्था झाली आहे.

म्हैसूर येथे सुरू असलेल्या या सामन्यात मंगळवारच्या ३ बाद २३३ धावांवरून पुढे खेळताना भारताने दिवसाच्या दुसऱ्याच षटकात नायरला ७८ धावांवर गमावले. त्यानंतर साहा व शिवम यांनी झटपट धावा काढण्यावर भर दिला. दोघांनी पाचव्या गडय़ासाठी ५७ धावा जोडल्यावर व्हर्नन फिलँडरने साहाला (६०) बाद केले. मात्र शिवमने १० चौकार व एका षटकारासह ६८ धावा फटकावून भारताला ४०० धावांपर्यंत नेण्यात मोलाची भूमिका बजावली. जलज सक्सेना (नाबाद ४८) आणि उमेश यादव (२४) यांनीही उपयुक्त योगदान दिले.

दुसऱ्या डावात आफ्रिकेचा संघ अद्याप २५८ धावांनी पिछाडीवर असून कर्णधार एडिन मार्करम दिवसअखेर ८३ धावांवर खेळत आहे. भारतातर्फे शाहबाज नदीम व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

भारत ‘अ’ (पहिला डाव) : १२३ षटकांत सर्व बाद ४१७ (शुभमन गिल ९२, करुण नायर ७८, शिवम दुबे ६८; विआन मल्डर ३/४७)

दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : ४६ षटकांत ५ बाद १५९ (एडिन मार्करम खेळत आहे ८३, थेनुस डीब्रून ४१; शाहबाज नदीम २/४१).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 19, 2019 3:32 am

Web Title: shivam dube and wriddhiman saha hit half centuries against south africa a zws 70
Next Stories
1 जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : जागतिक स्पर्धेतून  हिमा दासची माघार
2 आशियाई टेबल टेनिस स्पर्धा : भारतीय पुरुष संघाला पाचवे स्थान
3 Ind vs SA : हिटमॅनला मागे टाकत टी-२० क्रिकेटमध्ये कोहलीचा ‘विराट’ विक्रम
Just Now!
X