भारत ‘अ’-वेस्ट इंडिज कसोटी मालिका

पोर्ट ऑफ स्पेन : 

केमार होल्डर आणि रोमारिओ शेफर्ड या वेगवान जोडीसमोर भारत ‘अ’ संघाच्या फलंदाजांनी अक्षरश: शरणागती पत्करली. त्यामुळे मुंबईकर शिवम दुबेच्या झुंजार अर्धशतकानंतरही वेस्ट इंडिज ‘अ’ संघाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा डाव १९० धावांत संपुष्टात आला.

पहिल्या दिवसाच्या ५ बाद २४३ धावांवरून पुढे खेळताना विंडीजने पहिल्या डावात ३१८ धावांपर्यंत मजल मारली. रॅकहीम कोनवॉलने नाबाद ५६ धावा फटकावत विंडीजला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला.

प्रत्युत्तरात होल्डरने पाच, तर शेफर्डने तीन बळी पटकावत भारतीय फलंदाजीचे कंबरडे मोडले. सलामीवीर प्रियांक पांचाळ (५८) व शिवम (७९) वगळता भारताचे सात फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्याही गाठू शकले नाही. त्यामुळे भारताचा डाव ४७ षटकांत १९० धावांत आटोपला.

दुसऱ्या डावात संदीप वॉरियरने तीन फलंदाजांना शून्यावर माघारी धाडल्यामुळे दुसऱ्या दिवसअखेर विंडीजची ४ बाद १२ धावा अशी अवस्था झाली असून त्यांच्याकडे १४० धावांची आघाडी आहे. खलील अहमदने दुसऱ्या डावात एक बळी मिळवला आहे.

७९

शिवम दुबे

चेंडू     ८५

चौकार  ११

षटकार  २