18 October 2019

News Flash

शिवशंकर मंडळाला विजेतेपद; गणेश जाधव स्पर्धेत सर्वोत्तम

बंडय़ा मारुती क्रीडा मंडळातर्फे आयोजित पुरुषांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशंकर क्रीडा मंडळाने विजेतेपदावर नाव कोरले.

(संग्रहित छायाचित्र)

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

बंडय़ा मारुती क्रीडा मंडळातर्फे आयोजित पुरुषांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवशंकर क्रीडा मंडळाने विजेतेपदावर नाव कोरले. शिवशंकरच्याच गणेश जाधवला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

ललिता क्रीडा भवन क्रीडांगणावर झालेल्या अंतिम सामन्यात शिवशंकर मंडळाने विजय क्लबला २८-२० असे पराभूत केले. मध्यंतराला दोन्ही संघांत १०-१० अशी बरोबरी होती. मात्र त्यानंतर प्रो कबड्डीतील नामांकित खेळाडू श्रीकांत जाधव, नीलेश साळुंखे आणि गणेश जाधव यांनी अप्रतिम चढाया करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. त्यांना तुषार भोईर व सूरज बनसोडे यांची बचावात सुरेख साथ लाभली. विजय दिवेकरने अष्टपैलू, तर अमित चव्हाणने चढाईत दमदार खेळ करत विजय क्लबचा पराभव टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

त्यापूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये शिवशंकरने जय भारतला ४१-२० अशी धूळ चारली, तर विजय क्लबने सुवर्ण चढाईपर्यंत रंगलेल्या लढतीत स्वस्तिक मंडळावर २७-२७ (६-५) अशी सरशी साधली. विजय क्लबचा अमित चव्हाण सर्वोत्तम आक्रमक आणि विजय दिवेकर सर्वोत्तम बचावपटू  ठरला.

First Published on April 16, 2019 12:45 am

Web Title: shivshankar board wins title best of ganesh jadhav championship