न्यूझीलंड विरूद्धच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला २-० अशी हार पत्करावी लागली. दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानची अवस्था अतिशय वाईट झाली. पाकिस्तानला १ डाव आणि १५०हून अधिक धावांनी मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. पाकिस्तानच्या अशा कामगिरीनंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका करण्यात येत आहे. अशावेळी पाकिस्तानचा रावळपिंडी एक्सप्रेस शोएब अख्तर याने पाकिस्तानी खेळाडूंना खडे बोल सुनावले असून भीती व्यक्त केली आहे.
सचिन की द्रविड? शोएब अख्तरने निवडला आवडता क्रिकेटपटू
दुदैवाने पाकिस्तान क्रिकेट मरणासन्न अवस्थेत आहे. जेव्हा जेव्हा पाकिस्तानी संघ कसोटी क्रिकेट खेळतो तेव्हा दर्जाहीन क्रिकेट दिसून येतं. पाकिस्तान क्रिकेटची अवस्था दिवसेंदिवस खूपच वाईट होताना दिसते आहे. कसोटी क्रमवारीत पाकिस्तानचा संघ आठव्या स्थानी फेकला गेला आहे. पाकिस्तानचा संघ इतकं वाईट खेळत राहिला तर मला भीती आहे की पाकिस्तानच्या संघाला इतर देश कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी बोलवणं बंद करून टाकतील. पाकिस्तानच्या संघाचा दर्जा कसोटी क्रिकेटच्या योग्यतेचा नाही असं सारे म्हणू लागतील आणि ICCच्या नियमानुसार आपल्याला परदेश दौऱ्याचे निमंत्रण येणं पूर्ण बंद होईल”, असं अख्तर म्हणाला.
NZ vs PAK: द्विशतक ठोकत विल्यमसनचा विक्रम; पाकिस्तानी गोलंदाजांचा घेतला समाचार
पाकिस्तानी संघाच्या कामगिरीचा उतरता आलेख पाहता अख्तर म्हणाला, “आपण (पाकिस्तान) कसोटी सामना गमावला हा मुद्दा नाही. खरा मुद्दा असा आहे का आपण कसोटी सामना अतिशय घाणेरड्या पद्धतीने हारलो. पाकिस्तानी संघाची कामगिरी खूपच सुमार दर्जाची होती. पाकिस्तानच्या संघावर सध्या प्रचंड टीका केली जात आहे. माझ्यासकट सारेच जण पाकिस्तानच्या कामगिरी खूप नाराज आहेत.”
धोनीच्या झिवाला मिळाली पहिली जाहिरात; तुम्ही पाहिलात का VIDEO?
न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी सामन्यात एक डाव आणि १७६ धावांनी पराभूत केले. या विजयासह न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील गुणतालिकेत पहिल्यांदाच अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंडने पाकिस्तानला २-० असे पराभूत केले. केन विल्यमसनने कर्णधारपदाला साजेशी खेळी करत २३८ धावा कुटल्या. त्याने आपले चौथे कसोटी द्विशतक ठोकत अनेक विक्रमांना गवसणी घातली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 7, 2021 10:10 am