26 February 2021

News Flash

शोएब अख्तरला पाकिस्तान क्रिकेट मंडळाचा दणका

वाचा काय आहे प्रकार

पाकिस्तानी संघाचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरच्या खांद्यावर येत्या काही दिवसांत नवीन जबाबदारी येण्याची चर्चा जोर धरू लागली आहे. पाक क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचं अध्यक्षपद शोएब अख्तरला मिळण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. सध्या मिसबाह उल-हक कडे पाक क्रिकेट बोर्डाचं निवड समिती प्रमुख आणि मुख्य प्रशिक्षक अशी दोन्ही महत्वाची पद आहेत. परंतु नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंड दौऱ्यात पाकिस्तानची कामगिरी अतिशय खराब झाली. त्यामुळे पाक क्रिकेट बोर्ड मिसबाहची निवड समिती प्रमुख पदावरुन उचलबांगडी करू शकते अशी चर्चा आहे. पण याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने शोएब अख्तरला मात्र चांगलाच दणका दिला आहे.

काय म्हणाला होता शोएब अख्तर-

“पाक क्रिकेट बोर्डाने मला निवड समिती प्रमुख पदावर काम करण्याबद्दल विचारलं आहे. याबाबत माझी पाक क्रिकेट बोर्डातील काही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून मला ही नवीन जबाबदारी घ्यायला आवडेल. परंतू अद्याप काही गोष्टींवर चर्चा सुरु आहे, त्यामुळे अंतिम निर्णय झालेला नाही.” असे Cricket Baaz या यू-ट्युब कार्यक्रमात बोलत असताना शोएब अख्तरने सांगितलं होतं. चर्चेचा अधिक तपशील सांगण्यास मात्र अख्तरने नकार दर्शवला होता.

काय आहे पाक बोर्डाची भूमिका-

पाक क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली असल्याचे वृत्त टाइम्सनाऊने दिले आहे. “निवड समितीमध्ये बदल करण्याबाबतच्या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा आहेत. आम्हा सध्यातरी कोणताही बदल करण्याचा विचार नाही. सर्व महत्त्वाच्या पदांसाठी नियुक्त केलेल्यांचे अद्याप आम्ही मूल्यमापनदेखील केलेले नाही. आम्ही प्रत्येक अधिकाऱ्याचे आणि सदस्याचे योग्य पद्धतीने मूल्यमापन करणार आहोत. त्यामुळे आता कोणत्याही समितीमध्ये बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. शोएब अख्तरनेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांशी बैठक करण्यासाठी वेळ मागितली होती म्हणून ती बैठक झाली. त्यामागे दुसरा कोणताच हेतू नव्हता. अख्तरलाच त्या अधिकाऱ्यांना भेटायचं होतं, त्याला बोर्डाकडून बोलावण्यात आलेलं नव्हतं”, असं पाक क्रिकेट बोर्डाचा अधिकारी म्हणाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2020 12:12 pm

Web Title: shoaib akhtar slam by pakistan cricket board over new responsibility in selection committee vjb 91
Next Stories
1 श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा: हसीन जहाँची उच्च न्यायालयात याचिका
2 लीग-१ फुटबॉल : नेयमारसह पाच जणांना लाल कार्ड
3 आनंदविरुद्ध विजय हा कारकीर्दीतील सर्वोत्तम क्षण -विदित
Just Now!
X