28 February 2021

News Flash

एका गुणाच्या फरकाने हिनाची अंतिम फेरी हुकली

हिनाने ३८४ गुणांची कमाई करत १२वे स्थान पटकावले

| May 26, 2016 12:07 am

आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पध्रेत भारताच्या हिना सिधूची एका गुणाच्या फरकाने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात अंतिम फेरी हुकली. हिनाने ३८४ गुणांची कमाई करत १२वे स्थान पटकावले, तर अव्वल दहा खेळाडूंनी ३८५ गुणांसह अंतिम फेरीत स्थान पक्के केले. भारताच्या श्वेता सिंग आणि श्री निवेथा परमनाथम यांना अनुक्रमे ३७८ व ३७७ गुणांसह ४७ व ५२ व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
पुरुषांच्या ५०-मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकाराच्या पात्रता फेरीत भारताच्या चेन सिंगला ११७० गुणांसह ३८व्या स्थानावर समाधान मानावे लागले. अमेरिकेच्या मॅथ्यू इमोन्सने सुवर्णपदक पटकावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2016 12:07 am

Web Title: shooter heena sidhu misses out on final berth
टॅग : Heena Sidhu
Next Stories
1 IPL 2016, RCB vs GL: अविश्वसनीय विजयासह बंगळुरू अंतिम फेरीत
2 गंभीरच्या कोलकाता नाइट रायडर्सचे पारडे जड
3 मरे, व्हिनसचे संघर्षपूर्ण विजय
Just Now!
X