25 January 2021

News Flash

ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेला नेमबाजांची पसंती

करोनामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने वर्षभरातील सर्वच स्पर्धा रद्द केल्या आहेत

संग्रहित छायाचित्र

करोनामुळे घरात अडकलेल्या नेमबाजांना ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा पर्वणी ठरली. आता युवा नेमबाज मनू भाकरसह अनेक नेमबाजांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा सातत्याने व्हाव्यात, अशी मागणी केली आहे.

माजी भारतीय नेमबाज शिमॉन शरीफ यांच्या संकल्पनेतून बुधवारी प्रथमच झालेल्या ऑनलाइन स्पर्धेत अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय नेमबाजांनी भाग घेतला. करोनामुळे आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघाने वर्षभरातील सर्वच स्पर्धा रद्द केल्या आहेत. मात्र विश्वचषक सुवर्णपदकविजेती मनू याबाबत अनभिज्ञ होती. परंतु ते माहीत झाल्यावर ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेबाबत तिने उत्साहाने भाग घेतला.

‘‘ऑनलाइन नेमबाजी स्पर्धा हा अप्रतिम उपक्रम आहे. त्यामुळे आम्हाला एकत्रितपणे स्पर्धेची वातावरणनिर्मिती अनुभवता आली. खेळ जगभरातील लोकांना जोडतो, हेच या माध्यमातून साध्य करता आले,’’ असे मनूने सांगितले. या स्पर्धेत तिने ६० फैरी झाडत ५७२ गुणांची कमाई केली.

१० मीटर एअर रायफल प्रकारच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या दिव्यांश सिंग पनवारने आपले लक्ष्य बेडरूममधील कपाटात ठेवले होते. या आगळ्या संकल्पनेचे त्यानेही कौतुक केले.

दोन वेळा ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या संजीव रजपूतनेही ऑनलाइन स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने इमारतीच्या तळघरात आपले लक्ष्य योजले होते. मेघना सज्जानार १० मीटर एअर रायफल प्रकारात ६३०.५ गुणांसह दुसरी आली. हा एक वेगळा प्रयोग होता. परंतु मी लवकरच जुळवून घेतले, असे मेघनाने सांगितले. ऑस्ट्रियाच्या मार्टिन स्ट्रीम्फलने प्रथम क्रमांक पटकावला.

‘‘आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेला अपेक्षेपेक्षा उत्तम प्रतिसाद मिळाला. ‘फेसबुक’वरही १० हजारांहून अधिक प्रेक्षकांनी या स्पर्धेचा अनुभव घेतला. ही पात्रता स्पर्धा होती. आठवडय़ाभरात अंतिम टप्पाही असेल,’’ असे शरिफ यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2020 12:08 am

Web Title: shooters picks for online international shooting contest abn 97
Next Stories
1 आमच्या देशात आयपीएल भरवा ! ‘या’ क्रिकेट बोर्डाने दिली बीसीसीआयला ऑफर
2 कबड्डीप्रेमींसाठी पर्वणी ! २० एप्रिलपासून अनुभवा भारताच्या विश्वचषक विजयाचा थरार
3 अखेर IPL चं भवितव्य ठरलं; BCCI ने जाहीर केली अधिकृत भूमिका
Just Now!
X