News Flash

श्री समर्थ, ओम समर्थ संघांना विजेतेपद

अमर हिंद मंडळ, दादर आयोजित पुरुष-महिला व व्यावसायिक  जिल्हा अजिंक्य स्पर्धेत  पुरुष व महिला संघाचे अंतिम  फेरीचे सामने झाले.

(संग्रहित छायाचित्र)

जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा

अमर हिंद मंडळ, दादर आयोजित पुरुष-महिला व व्यावसायिक  जिल्हा अजिंक्य स्पर्धेत  पुरुष व महिला संघाचे अंतिम  फेरीचे सामने झाले. मंगळवारी झालेल्या पुरुषांच्या सामन्यात गतविजेत्या ओम समर्थच्या संघाने श्री समर्थाच्या संघावर निसटता विजय नोंदवला, तर महिला गटात गतविजेत्या श्री समर्थने  शिवनेरी सेवा मंडळावर विजय मिळवला.

आज झालेल्या पुरुषांच्या अंतिम  फेरीच्या रोमहर्षक सामन्यात गतविजेत्या ओम समर्थ भारत व्यायाम मंदिराच्या संघाने श्री समर्थ व्यायाम मंदिर दादरच्या संघावर निसटत्या  विजयाची नोंद केली. १५-१४ अशा एका गुणाने पराभव करत या गटातील लढत जिंकत सलग तिसऱ्या वर्षी अजिंक्यपद जिंकले. ओम समर्थच्या तन्मय पवार, शुभम शिगवण, प्रयाग कानगुटकर, विलास कारंडे, सनी तांबे, आशुतोष शिंदे यांनी चमक दाखविली.

महिलांच्या अंतिम लढतीत गतविजेत्या श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादरच्या संघाने शिवनेरी सेवा मंडळाच्या महिला संघावर  १२-१० असा दोन गुणाने सलग तिसऱ्या वर्षी  विजय मिळवला. स्पर्धेतील पुरस्कार विजेत्यांमध्ये अष्टपैलू  – साजल पाटील (श्री समर्थ), शुभम शिगवण (ओम समर्थ) तर आक्रमक म्हणून प्राजक्ता ढोबळे (श्री समर्थ), आशुतोष शिंदे (ओम समर्थ ) आणि संरक्षक म्हणून  दर्शना सकपाळ (शिवनेरी), वेदांत देसाई (श्री समर्थ) यांना गौरविण्यात आले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2019 1:08 am

Web Title: shree samarth om samarth won the championship
Next Stories
1 प्रशांत, काजल यांची विजेतेपदाला गवसणी
2 सिद्धार्थसाठी महाराष्ट्राची संघनिवड प्रलंबित
3 तिरंदाजी संघटनेवरील बंदीची शक्यता धूसर
Just Now!
X