News Flash

बीसीसीआय अन्याय करत असेल तर श्रीशांतने पुरावे द्यावे – कपिल देव

बंगळुरुतल्या कार्यक्रमात केलं वक्तव्य

श्रीशांतने पुरावे द्यावे - कपिल देव

स्पॉट फिक्सिंगप्रकरणी एस. श्रीशांतवर बंदी घातल्यानंतर भारताचे माजी खेळाडू कपिल देव यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जस श्रीशांतला बीसीसीआय आपल्यावर अन्याय करतय असं वाटत असेल, तर त्याने तसे पुरावे समोर आणावेत. बंगळुरुमधील एका कार्यक्रमात बोलत असताना कपिल देव यांनी हे वक्तव्य केलं आहे. २०१३ साली आयपीएल स्पॉटफिक्सिंग प्रकरणात श्रीशांतचं नाव समोर आलं होतं. यानंतर बीसीसीआयने श्रीशांतवर आजन्म क्रिकेट खेळण्यास बंदी घातली होती.

“प्रत्येक खेळाडूला आपण भारतासाठी खेळावं असं वाटत असतं. मात्र सरतेशेवटी ११ खेळाडूंनाच संघात जागा मिळते. जर बीसीसीआयला श्रीशांतविषयी आकस मनात ठेऊन वागत असेल, तर श्रीशांतने आपली बाजू सिद्ध होईल असे पुरावे मांडणं गरजेचं आहे.” आगामी काळात श्रीशांत आणि बीसीसीआय यांच्यात समेट होऊ शकतो का असं विचारलं असता, हा श्रीशांतचा वैयक्तिक आणि खासगी प्रश्न आहे; यावर मी भाष्य करणं योग्य ठरणार नाही असं कपिल देव म्हणाले.

अवश्य वाचा – बंदी बीसीसीआयने घातली, आयसीसीने नव्हे; दुसऱ्या देशाकडूनही खेळू शकतो: श्रीशांत

बीसीसीआयकडून घालण्यात आलेल्या बंदीविरोधात श्रीशांतने आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचं ठरवलं आहे. श्रीशांतने केलेले सर्व आरोप, बीसीसीआयच्या भ्रष्टाचार समितीचे प्रमुख निरज कुमार यांनी फेटाळले आहेत. बीसीसीआय अन्य आरोपींना वेगळा न्याय देत माझ्याशी सुडबुद्धीने वागत असल्याचं श्रीशांतने गेल्या काही दिवसांत आपल्या बचावात म्हणलं होतं. त्यामुळे या प्रकरणी आगामी दिवसांमध्ये आता काय घडामोडी घडतायत हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – आजीवन बंदीप्रकरणी श्रीशांत सर्वोच्च न्यायालयात जाणार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2017 7:38 pm

Web Title: shreeshant should back his claims if he feels bcci acting bias against him says former indian cricketer kapil dev
टॅग : Bcci,Kapil Dev
Next Stories
1 न्यूझीलंडची भारतावर ४० धावांनी मात, मालिकेत १-१ ने बरोबरी
2 राष्ट्रीय शिबीरासाठी हॉकी इंडियाकडून ३५ खेळाडूंची घोषणा
3 आजीवन बंदीप्रकरणी श्रीशांत सर्वोच्च न्यायालयात जाणार
Just Now!
X