25 September 2020

News Flash

भारत अ संघाची विंडीज अ संघावर मात, खलिल अहमद-श्रेयस अय्यर चमकले

खलिल अहमदचे ३ बळी

श्रेयस अय्यर आणि खलिल अहमद यांच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारत अ संघाने पहिल्या अनौपचारिक वन-डे सामन्यात विजय मिळवला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकीम जॉर्डन आणि रोस्टन चेसच्या भेदक माऱ्यासमोर भारत अ संघाचा डाव १९० धावांत आटोपला. मात्र खलिल अहमद आणि इतर भारतीय गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने सामन्यात ६५ धावांनी विजय मिळवला.

ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल हे भारताचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करु शकले नाहीत. कर्णधार मनिष पांडेही अवघ्या ४ धावा काढून माघारी परतला. मात्र यानंतर श्रेयस अय्यरने मधल्या फळीतल्या फलंदाजांना हाताशी धरुन अर्धशतकी खेळी केली. श्रेयस अय्यरने ७७ धावा केल्या, त्याच्या खेळीमुळे भारताने १९० धावांपर्यंत मजल मारली. विंडीज अ संघाकडून रोस्टन चेसने ४ तर अकीम जॉर्डनने ३ बळी घेतले. शेफर्ड आणि कॉर्नवॉल यांनी १-१ बळी घेतला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.

प्रत्युत्तरादाखल विंडीज अ संघाची सुरुवातही खराब झाली. विंडीजचा निम्मा संघ ९५ धावांवर माघारी परतला. खलिल अहमदने विंडीजच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडलं. मधल्या फळीत कार्टर आणि पॉवेल यांनी प्रत्येकी ४१-४१ धावांची खेळी करत विंडीजच्या डावाला आकार दिला. मात्र भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांचे प्रयत्न हाणून पाडले. भारताकडून खलिल अहमदने ३ तर राहुल चहर, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. दिपक चहरने एका फलंदाजाला माघारी धाडलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2019 1:11 pm

Web Title: shreyas iyer khaleel ahmed shine as india a beat west indies a by 65 runs psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : धोनीच्या निवृत्तीबद्दल चर्चा तरी का करायची? जावेद अख्तर धोनीच्या पाठीशी
2 World Cup 2019 : तुमचा कायम ऋणी राहीन, मोहम्मद शमीने मानले भारतीय चाहत्यांचे आभार
3 World Cup 2019 : उपांत्य सामन्यात वादग्रस्त निर्णय देणाऱ्या पंचांना अंतिम सामन्यात संधी
Just Now!
X