भारताचा आरएमव्ही गुरुसाईदत्त आणि सौरभ वर्मा यांनी मलेशियन ग्रां. प्रि. सुवर्णचषक बॅडमिंटन स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. महिलांमध्ये पी. सी. तुलसीने अंतिम आठ जणींमध्ये स्थान मिळवले.
गुरुसाईदत्तने इंडोनेशियाच्या विष्णू युली प्रासेत्यो याचे आव्हान २३-२१, २१-९ असे मोडीत काढले. सौरभने जपानच्या काझुमासा साकाय याला २१-१५, १७-२१, २१-१९ असे हरवले. तुलसीने भारताच्याच तन्वी लाड हिचा २३-२१, ७-२१, २१-१८ असा पराभव केला.