News Flash

तन्वी, सौरभची आगेकूच अरुंधती, सायलीचे आव्हान संपुष्टात

मुंबईकर तन्वी लाड, पी. सी. तुलसीसह नऊ भारतीय बॅडमिंटनपटूंनी मलेशिया ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली.

| March 27, 2014 06:53 am

मुंबईकर तन्वी लाड, पी. सी. तुलसीसह नऊ भारतीय बॅडमिंटनपटूंनी मलेशिया ग्रां. प्रि. बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सलामी दिली. मात्र अनुभवी अरुंधती पनतावणे आणि सायली गोखले यांना सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले.
तन्वीने इंडोनेशियाच्या दिनार द्याह ऑयुस्टिनवर २१-१९, २१-१७ असा विजय मिळवला. तुलसीने तैपेईच्या यु पो पैचा १६-२१, २१-१६, २१-१७ अशी मात केली. जपानच्या युकी फुकशिमाने सायली गोखलेवर २१-१३, २१-१३ असा विजय मिळवला. जपानच्याच अयुमी मिनेने चुरशीच्या लढतीत अरुंधती पनतावणेला १२-२१, २३-२१, २१-१९ असे नमवले.
पुरुषांमध्ये आठव्या मानांकित सौरभ वर्माने हाँगकाँगच्या यान किट चानवर २१-१२, २१-१७ असा विजय मिळवला. अनुभवी अनुप श्रीधरने इंडोनेशियाच्या धर्मा अल्री गुनावर २१-११, २१-१६ असा विजय मिळवला. माजी राष्ट्रीय विजेता चेतन आनंदने इंडोनेशियाच्या कासेर अकबरचा २१-११, २१-१४ असा पराभव केला. सहाव्या मानांकित आरएमव्ही गुरुसाईदत्तने भारताच्याच गौरव वेंकटचा २१-७, २१-८ असा धुव्वा उडवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2014 6:53 am

Web Title: shuttlers sourabh varma pc thulasi reach second round of malaysian grand prix gold
Next Stories
1 भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी ज्यूड फेलिक्स
2 विंडीजपुढे बांगलादेश नतमस्तक!
3 श्रीनिवासन यांनी पायउतार व्हावे, अन्यथा आदेश द्यावे लागतील : सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
Just Now!
X