News Flash

जागतिक बॅडमिंटन क्रमवारी : सिंधू पुन्हा दहाव्या स्थानावर

भारताची उदयोन्मुख खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे.

| September 28, 2013 01:44 am

भारताची उदयोन्मुख खेळाडू पी. व्ही. सिंधू हिने जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पुन्हा पहिल्या दहा क्रमांकांमध्ये स्थान मिळविले आहे. तिने दहाव्या स्थानावर झेप घेतली असून ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने आपले चौथे स्थान कायम राखले आहे.
सिंधू ही मागील आठवडय़ात बाराव्या स्थानावर होती. जपान खुल्या स्पर्धेत तिला दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी तिने दहावे स्थान मिळविले आहे. पुरुष गटात पारुपल्ली कश्यप व आरएमव्ही गुरुसाईदत्त यांना अनुक्रमे १४वे व २४वे स्थान मिळाले आहे. अजय जयराम याने २६वे स्थान घेतले आहे. किदम्बी श्रीकांत व एच. एस. प्रणय यांनी अनुक्रमे ३२वे व ४२वे स्थान मिळविले आहे. आनंद पवारला ३४वे तर सौरभ वर्मा याला ४३वे स्थान मिळाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2013 1:44 am

Web Title: sindhu back in top 10
टॅग : Pv Sindhu
Next Stories
1 स्पॅनिश लीग फुटबॉल स्पर्धा : रोनाल्डोशाही!
2 सुल्तान जोहोर बाहरू हॉकी स्पर्धा : भारताकडून कोरियाचा धुव्वा
3 कार्लिग चषक फुटबॉल स्पर्धा : मँचेस्टर युनायटेडचा लिव्हरपूलवर विजय
Just Now!
X