24 September 2020

News Flash

सिंधू, प्रणीत, सिक्की यांचा चार महिन्यांनी सरावाला प्रारंभ

करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेले चार महिने या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंचा सराव स्थगित होता.

पुलेला गोपीचंद आणि पी. व्ही. सिंधू

 

विश्वविजेती पी. व्ही. सिंधू, बी. साईप्रणीत आणि एन. सिक्की रेड्डी यांनी हैदराबादच्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत शुक्रवारपासून सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत सरावाला प्रारंभ केला.

करोनाच्या साथीमुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेले चार महिने या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटूंचा सराव स्थगित होता. ऑलिम्पिकच्या दृष्टीने भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ)  आणि तेलंगण सरकारच्या परवानगीने राष्ट्रीय बॅडमिंटन शिबिराला प्रारंभ झाला आहे.

चिराग-सात्त्विकला दोन आठवडय़ांची प्रतीक्षा

हैदराबादच्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यासाठी चिराग शेट्टी आणि सात्त्विकसाईराज रनकीरेड्डी या भारतातील पुरुष दुहेरीतील आघाडीच्या जोडीला आणखी किमान दोन आठवडय़ांची प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागाची आशा असलेल्या पुरुष दुहेरी जोडीतील चिराग मुंबईत आणि सात्त्विक आंध्र प्रदेशातील अमलापूरम येथील आपल्या निवासस्थानी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 12:18 am

Web Title: sindhu praneet sikki start training after four months abn 97
Next Stories
1 “पाकिस्तानी क्रिकेटपटू काहीही बडबड करतात”
2 T20 World Cup 2021 चे यजमानपद भारताकडेच!
3 भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग करोना पॉझिटिव्ह
Just Now!
X