News Flash

इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पर्धा : सिंधू, श्रीकांत, गुरू यांची आगेकूच

सिंधूची पुढील फेरीत सातव्या मानांकित यांग मि ली आणि ही बिंगजियाओ (चीन) यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.

| December 4, 2015 01:19 am

पी. व्ही. सिंधू

अव्वल मानांकित पी. व्ही. सिंधू आणि के. श्रीकांत यांनी शानदार विजयासह एक लाख २० हजार डॉलर पारितोषिक रकमेच्या इंडोनेशिया मास्टर्स ग्रां. प्रि. गोल्ड बॅडमिंटन स्पध्रेची तिसरी फेरी गाठली आहे. गेल्याच आठवडय़ात मकाऊ खुल्या ग्रां. प्रि. गोल्ड स्पध्रेचे विजेतेपद पटकावणाऱ्या सिंधूने महिला एकेरीत इंडोनेशियाच्या वुहान काहया उतामी सुकुपुत्रीचा २१-१२, २१-९ असा सहज पराभव केला.
जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत दोनदा कांस्यपदक जिंकणाऱ्या सिंधूची पुढील फेरीत सातव्या मानांकित यांग मि ली आणि ही बिंगजियाओ (चीन) यांच्यातील विजेत्याशी गाठ पडेल.
बीडब्ल्यूएफ सुपर सीरिज फायनल्ससाठी पात्र ठरणाऱ्या जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावरील श्रीकांत पुरुष एकेरीत झुंजार लढत देत इंडोनेशियाच्या सपुत्र विकी अंगाचा २१-१४, १७-२१, २५-२३ असा पराभव केला. तिसऱ्या फेरीत त्याची चीनच्या क्विआओ बिनशी लढत होईल. आठव्या मानांकित आरएमव्ही गुरूसाइदत्तने तिसरी फेरी गाठताना सिंगापूरच्या किआन येव लोहचा २१-१९, १९-२१, २१-१५ असा पराभव केला. पुढील फेरीत मलेशियाच्या इस्कंदर झुल्करनैन झैनुद्दीनशी त्याचा सामना होणार आहे.
तिसऱ्या मानांकित एच. एस. प्रणॉयचे आव्हान मात्र संपुष्टात आले. चीनच्या शि युकीने त्याचा २१-१२, २०-२२, २१-१३ असा पराभव केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2015 1:19 am

Web Title: sindhu srikanth gurusaidutt reach round 3 of indonesia masters
टॅग : Pv Sindhu,Sindhu
Next Stories
1 ऑस्कर पिस्टोरियसला दिलासा नाहीच
2 रणजी क्रिकेट स्पर्धा : महाराष्ट्राचे आव्हान कायमत्रिपाठी व मुंडेची शानदार खेळी
3 ऑस्कर पिस्टोरियस खुनाच्या गुन्ह्यातही दोषी
Just Now!
X