News Flash

सिंधूची डेन्मार्क चषक स्पर्धेतून माघार

एका स्पर्धेसाठी इतका धोका का पत्करायचा,

(संग्रहित छायाचित्र)

डेन्मार्क चषक बॅडमिंटन स्पर्धा

जगज्जेत्या पीव्ही सिंधू हिने ओडेन्से येथे १३ ते १८ ऑक्टोबरदरम्यान रंगणाऱ्या डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घेतली आहे.

डेन्मार्क येथे होणाऱ्या थॉमस आणि उबर चषक बॅडमिंटन स्पर्धा स्थगित करण्यात आल्याने एकाच स्पर्धेत भाग घेऊन करोनाचा धोका पत्करण्यास सिंधू तयार नाही. ‘‘थॉमस आणि उबर चषकातही सुरुवातीला सहभागी होण्यास मी तयार नव्हते. पण भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांच्या आग्रहामुळे मी खेळण्यास तयार झाले होते. या स्पर्धाच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. डेन्मार्कमध्ये करोनाचा मोठय़ा प्रमाणावर धोका आहे. त्यामुळे एका स्पर्धेसाठी इतका धोका का पत्करायचा,’’ असे सिंधूने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 18, 2020 12:17 am

Web Title: sindhu withdraws from denmark cup abn 97
Next Stories
1 VIDEO: काय चाललंय काय… फिंचने मागितलेला DRS पाहून तुम्हीही हेच म्हणाल
2 सचिन, विराटसह क्रिकेटविश्वातून पंतप्रधान मोदींनी शुभेच्छा
3 VIDEO : भन्नाट! सामन्याच्या पहिल्याच दोन चेंडूवर स्टार्कने ‘असे’ घेतले दोन बळी
Just Now!
X