News Flash

भारताकडून सिंगापूरचा धुव्वा

सुरुवातीपासून ‘एकास एक’ तंत्र अवलंबलेल्या विजेत्यांचा बचाव भेदणे सिंगापूरला अशक्य झाल्याने सामना पूर्णपणे एकतर्फी झाला.

प्रतिनिधिक छायाचित्र

मुकुंद धस

आशियाई बास्केटबॉल स्पर्धा

यजमान भारताने शेवटच्या साखळी सामन्यात सिंगापूरचा ७९-४९ असा धुव्वा उडवून बंगळुरू येथे सुरू असलेल्या आशियाई १८ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉल स्पर्धेच्या ‘ब’ विभागाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य सामन्यात त्यांची गाठ हॉंगकॉंग-सिंगापूर संघांमधील विजेत्यांशी शुक्रवारी पडेल. दुसरा उपांत्य सामना सीरिया आणि इराण-कझाकस्तानच्या विजेत्यांमध्ये रंगणार आहे.

सुरुवातीपासून ‘एकास एक’ तंत्र अवलंबलेल्या विजेत्यांचा बचाव भेदणे सिंगापूरला अशक्य झाल्याने सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. धर्षिनी, ऐश्वर्या आणि हर्षिताने सुंदर समन्वय राखत भराभर गुण नोंदवण्याचा सपाटा लावला होता. तर पुष्पा आणि श्रीकलाने बचावाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली होती. पहिल्या सत्रात केवळ ३ गुण नोंदविलेल्या सिंगापूरने  दुसऱ्या  सत्रात आपला खेळ उंचावून विजेत्यांना चांगली लढत दिली.परंतु मध्यंतरानंतर भारताच्या गुलाबशा अलीने लागोपाठ ३ गुणांचे तीन बास्केट नोंदवून आघाडी वाढवण्यास मदत केली. हर्षिता आणि ऐश्वर्यानेदेखील मोक्याच्या क्षणी बास्केट करून सिंगापूरच्या आव्हानात हवाच काढून टाकली. शेवटच्या सत्रात सिंगापूरकडून प्रतिकार झाला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2018 4:24 am

Web Title: singapore fumes from india
Next Stories
1 टेनिसच्या उपचाराने प्रांजलाच्या कारकीर्दीला उभारी!
2 रामकुमारचे एकेरीतील आव्हान संपुष्टात
3 महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत अ‍ॅँडरसनचा सहभाग निश्चित
Just Now!
X