IPLचा पहिलाच हंगाम .. किंग्ज इलेव्हन पंजाबने मुंबई इंडियन्सचा केलेला पराभव .. आणि त्यानंतर हरभजनने श्रीसंतच्या लगावलेली कानाखाली ….आजही क्रिकेटप्रेमींना ही घटना चांगलीच लक्षात आहे. या घटनेनंतर हरभजन सिंगवर प्रचंड टीका करण्यात आली. त्याच्यावर काही सामन्यांची बंदीदेखील घालण्यात आली. याबाबत आता सुमारे ११ वर्षानंतर हरभजन सिंगने याने आपले मत व्यक्त केले आहे.

हरभजनला एका मुलाखती दरम्यान हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना तो म्हणाला की श्रीसंत आणि माझ्यात मैदानावर जे काही झालं, त्याबाबत लोक अजूनही बोलतात. जर मला माझ्या भूतकाळात मागे जात आले आणि एखादी गोष्ट बदलता आली, तर मात्र मी माझी ती चूक सुधारेन. कारण श्रीसंतला कानाखाली मारणे हि माझी चूकच होती.

‘त्या दिवशी मी जे केलं, ते फार चुकीचं होत. मी तसं करायला नको होतं. श्रीसंत हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या कौटुंबिक जीवनासाठी माझ्याकडून त्याला शुभेच्छा. बाकी लोक काय म्हणत असतील, तरी मला त्याचा काही फरक पडत नाही. मी अजूनही तुझा भाऊ आहे’, असेही हरभजन म्हणाला.