01 October 2020

News Flash

मराठमोळी स्मृती ICC Rankingमध्ये अव्वल स्थानावर

आयसीसीने आज क्रमवारी जाहीर केली.

मराठमोळी स्मृती मानधनाच्या शिरपेचात आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आयसीसीच्या महिला एकदिवसीय फलंदाजी कर्मवारीत स्मृती मानधना अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. आयसीसीने आज शनिवारी क्रमवारी जाहीर केली.

स्मृतीने न्यूझीलंड विरोधात तीन एकदविसीय सामन्यात दमदार फलंदाजी करत मालिकाविर पुरस्कार पटकावला होता. न्यूझीलंडविरोधातील दमदार फलंदाजीच्या जोरावर स्मृतीने ऑस्ट्रलियाच्या एलिस पॅरी आणि मेग रॅनिंग्जला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले आहे. मनधाना गतवर्षापासून चांगल्या लयीत आहे. २०१८ मध्ये स्मृतीने दोन शतकांसह आठ अर्धशतके झळकावली आहेत. नुकतेच भारतीय महिला संघाची सलामीवीर स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) २०१८ वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे.

भारताविरोधात उत्कृष्ट प्रदर्शन करणारी न्यूझीलंड संघाची कर्णधार एमी सॅटरवेटला दहा अंकाचा फायदा झाला आहे. एमी आथा चौथ्या स्थानावर पोहचली आहे. भारताची कर्णधार मितालीला एक क्रमचा फटका बसला आहे. मिताली चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरली आहे.

दरम्यान, भारतीय महिला संघाने न्यूझीलंडमध्ये सुरु असलेली एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला हार पत्करावी लागली, पण पहिल्या दोन सामन्यातील विजयाच्या जोरावर भारताने मालिका खिशात घातली. २८ धावांत ४ बळी टिपणाऱ्या अना पीटरसन हिला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. तर मराठमोळी स्मृती मंधाना ‘मालिकावीर’ ठरली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 5:35 pm

Web Title: smriti mandhana becomes world no 1 odi batswoman
Next Stories
1 अखेरच्या सामन्यात धोनी खेळणार, ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू?
2 अखेरच्या वनडेआधी न्यूझीलंडला मोठा धक्का
3 भारताची निराशाजनक सुरुवात!
Just Now!
X