टीम इंडियाची मराठमोळी सलामीवीर स्मृती मंधाना हिला ICC च्या २०१९ या वर्षातील एकदिवसीय आणि टी २० संघात स्थान मिळाले आहे. वर्षभरात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करणाऱ्या सर्वोत्तम खेळाडूंचा मिळून ICC वर्षाअखेरीस एक संघ जाहीर करते. त्यातील एकदिवसीय आणि टी २० अशा दोनही संघात भारताच्या स्मृती मंधानाचा समावेश करण्यात आला आहे. स्मृतीने वर्षभरात ५१ एकदिवसीय सामने तर ६६ टी २० सामने खेळले. त्यात तिने अनुक्रमे २ हजार २५ आणि १ हजार ४५१ धावा केल्या. तिच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर ICC कडून तिला हा बहुमान मिळाला आहे.

स्मृतीव्यतिरिक्त शिखा पांडे, झुलन गोस्वामी आणि पूनम यादव यांचाही वर्षाच्या एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे. तर दीप्ती शर्मा आणि राधा यादव या दोघींनी टी २० संघात स्थान मिळवले आहे. ICC ने मंगळवारी दोनही संघ जाहीर केले.

ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरी हिला सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू घोषित करण्यात आलं. एलिस पेरी हिला सर्वोत्तम एकदिवसीय महिला क्रिकेटपटूही घोषत करण्यात आले.

गेल्या वर्षी सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू हा बहुमान स्मृती मंधानाला मिळाला होता.