News Flash

मराठमोळ्या स्मृती मंधानाची टी-20 क्रिकेटमध्ये सर्वोत्तम खेळीची नोंद

मात्र स्मृतीने शतकाची संधी गमावली

तिसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला. दोन धावांनी न्यूझीलंडच्या महिलांनी बाजी मारत मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवलं. 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून स्मृती मंधानाने धडाकेबाज अर्धशतकी खेळीची नोंद केली. स्मृतीने 86 धावांची खेळी करत भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं. मात्र मोठा फटका खेळण्याच्या नादात स्मृती झेलबाद होऊन माघारी परतली. मात्र यादरम्यान स्मृतीने टी-20 क्रिकेटमधल्या आपल्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.

याआधी 2018 साली स्मृतीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यात 83 धावा पटकावल्या होत्या. मात्र आजच्या सामन्यात स्मृतीने आपल्या जुन्या खेळीला मागे टाकत आणखी एक सर्वोत्तम खेळी उभारली आहे. या मालिकेनंतर भारतीय महिला संघ घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध 3 वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

अवश्य वाचा – न्यूझीलंडचा भारतीय महिलांना व्हाईटवॉश, अखेरच्या टी-20 मध्येही भारत पराभूत

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2019 12:59 pm

Web Title: smriti mandhana pled her best inning in t20i against nz in 3rd t20i
Next Stories
1 इतिहास घडवण्याची संधी भारताने गमावली, यजमानांची मालिकेत बाजी
2 न्यूझीलंडचा भारतीय महिलांना व्हाईटवॉश, अखेरच्या टी-20 मध्येही भारत पराभूत
3 एका नो-बॉलची शिक्षा 500 रुपये, नो-बॉलवर विकेट घेतल्यास हजार रुपयांचा दंड !
Just Now!
X