03 June 2020

News Flash

अखेरीस लग्नाबद्दल स्मृती मंधानाने सोडलं मौन, म्हणाली…

सोशल मीडियावर दिलं उत्तर

करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवस लॉकडाऊन जाहीर केलं आहे. या काळात आयपीएलसह सर्व महत्वाच्या स्पर्धा बंद असल्यामुळे भारतीय संघाचे सर्व खेळाडू घरात बसून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मंधाना सध्या आपल्या सांगलीतल्या घरी आहे. बीसीसीआयच्या BCCI Women या अधिकृत ट्विटर हँडलने लॉकडाऊनच्या काळात क्रिकेट चाहत्यांना स्मृतीला त्यांच्या मनातले प्रश्न विचारण्याची संधी दिली.

ट्विटरवर चाहत्यांनी या संधीचा लाभ घेत स्मृतीला क्रिकेटविषयी, तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक प्रश्न विचारले. एका चाहत्याने स्मृतीला तुला लग्न कसं करायला आवडेल लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?? असा प्रश्न विचारला..

स्मृतीनेही या प्रश्नाला अगदी हजरजबाबीपणे उत्तर दिलं. पाहा काय म्हणाली स्मृती…

देशात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी लढा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. त्याआधी एक दिवस स्मृती मुंबईवरुन आपल्या सांगलीतल्या घरी परतली होती. सध्या खबरदारीचा उपाय म्हणून ती क्वारंटाइन झालेली असून महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी तिच्यावर नजर ठेवून आहेत. नुकत्याच ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्मृती सहभागी झाली होती. मात्र अंतिम सामन्यात भारतीय महिलांना पराभवाचा सामना करावा लागला. या संपूर्ण स्पर्धेत स्मृतीला आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आली की स्मृती मैदानात उतरल्यानंतर आश्वासक कामगिरी करेल अशी सर्वांना आशा आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 9:12 pm

Web Title: smriti mandhana spills bin on her marriage on social media psd 91
Next Stories
1 निवृत्तीबद्दल विचारल्यावर धोनीला राग येतो, जवळच्या मित्राने दिली माहिती
2 चला, जेवायची वेळ झाली ! जेव्हा विराट-पिटरसनच्या लाईव्ह चॅटमध्ये अनुष्काचा मेसेज येतो…
3 Video : रोहितची चिमुरडी करतेय बुमराहच्या गोलंदाजीची नक्कल
Just Now!
X