एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत शानदार विजयासह सोमदेव देववर्मनने आपला वाढदिवस साजरा केला. सोमदेवने स्पेनच्या अॅड्रियन मेनेनडेझवर ४-६, ६-१, ६-३ अशी मात करत उपांत्य फेरीत आगेकूच केली. उपांत्य फेरीत सोमदेवसमोर रशियाच्या इव्हजेनी डॉनस्कॉयचे आव्हान असणार आहे. डॉनस्कॉयविरुद्धच्या याआधीच्या लढतीत सोमदेवने विजय मिळवला होता. अन्य लढतींमध्ये कझाकिस्तानच्या अलेक्झांड्र नेडोव्येसव्हने फ्रान्सच्या डेव्हिड गुझचे आव्हान ६-१, ६-३ असे संपुष्टात आणले. सर्बियाच्या इलिझा बोझोलिकने अर्जेटिनाच्या ऑगस्टिन वेलोटीवर ६-४, ६-४ अशी मात केली. पुरुष दुहेरीत साकेत मायनेनी-सनम सिंग आणि दिविज शरण-विष्णू वर्धन जोडय़ांनी आपापल्या लढती जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 14, 2014 3:58 am