29 September 2020

News Flash

एटीपी चीन टेनिस : सोमदेवची गाठ वेर्डास्कोशी

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने आपल्यापेक्षा सरस असलेल्या इटलीच्या पावलो लोरेन्झी याचा पराभव करत एटीपी चीन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे.

| October 1, 2013 01:04 am

भारताचा आघाडीचा टेनिसपटू सोमदेव देववर्मन याने आपल्यापेक्षा सरस असलेल्या इटलीच्या पावलो लोरेन्झी याचा पराभव करत एटीपी चीन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत स्थान मिळवले आहे. पात्रता फेरीतील दुसऱ्या आणि अंतिम सामन्यात सोमदेवने लोरेन्झीचा ३-६, ७-६ (५), ६-३ असा पराभव केला.  मुख्य फेरीत मात्र सोमदेवची कसोटी लागणार आहे. त्याला पहिल्याच फेरीत जागतिक क्रमवारीत ३१व्या स्थानावर असलेल्या फर्नाडो वेर्डास्को याचा सामना करावा लागणार आहे. सोमदेवने वेर्डास्कोचा अडथळा पार केला तर त्याची पुढील फेरीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचशी गाठ पडण्याची शक्यता आहे. दुहेरीत, लिएण्डर पेस आणि त्याचा कॅनडाचा साथीदार डॅनियल नेस्टॉर यांना अग्रमानांकन मिळाले आहे. त्यांना पहिल्या फेरीत अमेरिकेच्या जॉन आयनेर आणि सॅम क्वेरी यांच्याशी लढत द्यावी लागेल. दुसऱ्या मानांकित महेश भूपती आणि त्याचा स्विडनचा साथीदार रॉबर्ट लिंडस्टेड यांची सलामीची लढत नोव्हाक जोकोव्हिच आणि स्वित्र्झलडच्या स्टॅनिस्लॉस वावरिंका यांच्याशी होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 1, 2013 1:04 am

Web Title: somdev devvarman to face fernando verdasco in china open
टॅग Somdev Devvarman
Next Stories
1 सुआरेझचा दुहेरी धमाका : लिव्हरपूलचा सफाईदार विजय
2 चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा : सनरायझर्सचा अस्त!
3 संघ निवडीच्या निर्णयात सहभाग देण्याची गरज -आनंद अमृतराज
Just Now!
X