भारताच्या सोमदेव देववर्मन याने क्रोएशियाच्या अँते पेव्हिक याच्या साथीत बार्सिलोना ओपन टेनिस स्पर्धेत दुहेरीत विजयी सलामी केली. त्यांनी स्थानिक खेळाडू रॉबर्ट बाटिस्टा अ‍ॅगूट व अलबर्ट मोन्तानेस यांचा ६-४, ६-४ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला.
सोमदेव याने दोन महिन्यांनंतर एटीपी स्पर्धेत पहिला विजय नोंदविला आहे.
सोमदेव व पेव्हिक यांची जेसा हुटा गालुंग व स्टीफन रॉबर्ट यांच्याशी गाठ पडणार आहे.