आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि इतर मुंबईकर खेळाडूंनी  बायो बबलमध्ये प्रवेश घेतला आहे. विविध गट करून या खेळाडूंनी मुंबईच्या बबलमध्ये एन्ट्री घेतली आहे. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. या सामन्यानंतर टीम इंडिया इंग्लंडसोबत पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल.

आज सोमवारी मुंबईस्थित खेळाडूंनी बायोबबलमध्ये प्रवेश केला. टीम इंडिया २ जूनला इंग्लंडसाठी रवाना होईल. आज बायो बबलमध्ये प्रवेश केलेल्यांना सात दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल. मुंबईतील सदस्यांव्यतिरिक्त इतर खेळाडूंनी १९ मेला आपला क्वारंटाइन कालावधी सुरू केला आहे. त्यामुळे या आठवड्यात बबलमध्ये प्रवेश घेतलेल्या सदस्यांना त्यांची भेट घेणे शक्य होणार नाही. कोणत्याही प्रकारे करोनाच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन होणार नाही, याची बीसीसीआय काळजी घेत आहे.

हेही वाचा – करोनाची लस घेण्यासाठी तरुणाला चोपले?, हरभजनने व्यक्त केला संताप

मुंबईला पोहोचला रवींद्र जडेजा</strong>

यापूर्वी रवींद्र जडेजाने मुंबईत पोहोचल्यानंतर क्वारंटाइन राहत असल्याची माहिती दिली होती. जडेजाने इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली होती. त्याने त्याचा एक फोटो पोस्ट केला होता. बीसीसीआयने बायो बबलमध्ये राहणाऱ्या खेळाडूंसाठी त्यांच्या रुममध्ये प्रशिक्षणाचीही व्यवस्था केली आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

यापूर्वी बीसीसीआयने म्हटले होते, की ते आपल्या खेळाडूंसाठी दररोज चाचण्या घेतील. बीसीसीआयने खेळाडूंसाठी लसीचा दुसरा डोसही आयोजित केला आहे. भारतीय पुरुष संघाशिवाय महिला संघदेखील २ जून रोजी इंग्लंड दौर्‍यासाठी रवाना होईल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम १८ ते २२ जून दरम्यान होईल. यानंतर टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळेल. ४ ऑगस्टपासून नॉटिंगहॅमध्ये याची सुरुवात होईल. मालिकेचा शेवटचा सामना मँचेस्टरमध्ये १० सप्टेंबर रोजी खेळला जाईल.

हेही वाचा – सागर राणा हत्याकांड : सुशील कुमारचं नोकरीवरून निलंबन