इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या नेटवेस्ट टी-२० ब्लास्ट स्पर्धेत सोमरसेट्सच्या पिटर ट्रेगोने घेतलेला झेल हा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. मिडलसेक्स विरुद्ध सोमरसेट्स या सामन्यात ट्रेगोने मिड ऑफवर ब्रेंडन मॅक्युलमचा एका हातात झेल घेऊन सगळ्यांनाच थक्क केलं. हा झेल पाहून अनेकांना ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटींगची आठवण आली. श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात रिकी पाँटींगनेही आपल्या क्षेत्ररक्षणातली चपळाई दाखवत केवळ एका हाताने झेल पकडला होता.

टीम ग्रोएनवॉल्डच्या गोलंदाजीवर ट्रेगोने हा झेल घेतला. ज्याने काही क्षणातच सर्व क्रिकेटरसिकांना पाँटींगची आठवण करुन दिली.

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर रिकी पाँटींगने घेतलेला झेल पुन्हा एकदा पहा.

पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात मिडलसेक्सने सोमरसेट्ससमोर १६२ धावांचं आव्हान ठेवलं होतं. सोमरसेट्सच्या जेम्स हिल्डर्थने ३४ चेंडुंमध्ये ६३ धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या षटकामध्ये १३ धावांची गरज असताना कोरी अँडरसन आणि रुडॉल्फ व्हॅन डर मर्व यांनी १ चेंडु शिल्लक ठेवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.