News Flash

सौम्यजीत घोषला दुहेरी मुकुट

पुरुष एकेरीत ही स्पर्धा जिंकणारा घोष हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

| May 2, 2017 01:59 am

पुरुष एकेरीत ही स्पर्धा जिंकणारा घोष हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

सांतियागो येथे झालेल्या सीमास्टर २०१७ आयटीटीएफ चॅलेंज चिली खुल्या टेबल टेनिस स्पध्रेत भारताच्या सौम्यजीत घोषने एकेरी आणि दुहेरी गटात सुवर्णपदकाची कमाई करीत दुहेरी यश मिळवले.

अव्वल मानांकित घोषने अ‍ॅन्थनी अमलराजचा ४-२ (८-११, १३-११, ११-६, ११-९, ११-७) असा पराभव करीत एकेरीचे विजेतेपद पटकावले. त्याआधी घोषने अमलराजच्या साथीने पुरुष दुहेरीचे विजेतेपद मिळवले. या जोडीने फिलिप फ्लोरिट्झ आणि ह्यूनर झॉक्सचा ४-० (१३-११, १०-१२, १४-१२, ११-९) असा पराभव केला.

आयटीटीएफ जागतिक टूर स्पर्धा किंवा आयटीटीएफ चॅलेंज मालिकेमध्ये प्रथमच भारताने पुरुष दुहेरीमध्ये जेतेपद मिळवण्याची किमया साधली आहे. पुरुष एकेरीत ही स्पर्धा जिंकणारा घोष हा तिसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.

आमच्यासाठी हे यश अभिमानास्पद आहे. कारण प्रथमच आम्ही ही स्पर्धाजिंकली आहे, याचप्रमाणे भारतासाठीसुद्धा दुहेरीत प्रथमच यश मिळवून दिले आहे. आनंद होणे स्वाभाविक आहे, परंतु दडपणसुद्धा तितकेच होते.

– सौम्यजित घोष

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 2, 2017 1:59 am

Web Title: soumyajit ghosh win singles and doubles gold at chile open
Next Stories
1 चेसच्या नाबाद शतकामुळे विंडीजचा डाव सावरला
2 झगडणाऱ्या दिल्लीचा आज बलाढय़ हैदराबादशी सामना
3 बीसीसीआयकडून चेतेश्वर पुजारा, हरमनप्रीत कौरची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस
Just Now!
X