News Flash

२०२१ साली भारत चौरंगी मालिका खेळणार, BCCI अध्यक्षांची घोषणा

जाणून घ्या कोणते संघ होणार सहभागी

बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली यांनी भारतीय संघ २०२१ साली चौरंगी मालिकेत सहभागी होईल अशी घोषणा केली आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे देश चौरंगी मालिकेत सहभागी होतील, मात्र चौथा देश कोणता असेल याबद्दल अजुन निर्णय झालेला नाहीये. ४ देशांचा सहभाग असलेल्या या Super Series स्पर्धेचं पहिलं सत्र भारतात खेळवलं जाईल असंही गांगुलीने स्पष्ट केलं.

काय आहे पार्श्वभूमी??

२०२३ ते २०३१ या सालापर्यंत आयसीसीने एक महत्वाची स्पर्धा आयोजित करण्याची कल्पना मांडली होती. मात्र बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाने या कल्पनेला विरोध केला होता. नियमांमध्ये स्पष्टता नसल्यामुळे आयसीसीची ही कल्पना मागे पडली. मात्र आता बीसीसीआयच्या पुढाकाराने या स्पर्धेसाठीचं पहिलं पाऊल पडताना दिसतंय.

“ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारतासोबत आणखी एक महत्वाचा संघ या स्पर्धेत सहभागी होईल. पहिलं सत्र भारतात खेळवलं जाईल, इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी आमचे चांगले संबंध आहेत आणि बैठकीत याबद्दल सकारात्मक निर्णय घेतला गेला आहे.” एका खासगी कार्यक्रमात सौरव गांगुलीने Super Series स्पर्धेबद्दल माहिती दिली. त्यामुळे ३ संघाव्यतिरीक्त कोणता संघ या चौरंगी मालिकेत सहभागी होतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2019 1:58 pm

Web Title: sourav ganguly announces 4 nation super series featuring india australia england and another top team psd 91
टॅग : Bcci,Icc
Next Stories
1 टीम इंडियाचा सरत्या वर्षाला विजयी निरोप, मुंबईकर शार्दुलची निर्णायक फटकेबाजी
2 कटकलाही धावांचा वर्षांव!
3 सावध ऐका पुढल्या हाका!
Just Now!
X