भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदी निवड होण्याचा भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली यांच्या नावाची चर्चा होती. मात्र सोमवारी केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदासाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे आता गांगुली BCCI चे अध्यक्षपद भूषवणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्या दरम्यान भारताचा यष्टिरक्षक वृद्धिमान साहा याने गांगुलीचे कौतुक केले आहे.

IND vs SA : …म्हणून कर्णधार नाही तर ‘हा’ खेळाडू उडवणार टॉस

“सौरव गांगुली हा खेळाडू म्हणून खूप वर्षे खेळला आहे. त्याला खेळाडूंच्या गरजा आणि आवश्यकता माहिती आहेत. खेळाडूंमध्ये ड्रेसिंग रूमच्या आत कशाप्रकारचे वातावरण असते याची गांगुलीला चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे टीम इंडियासाठी आणि खेळाडूंसाठी गांगुलीची BCCI च्या अध्यक्षपदी होणारी निवड महत्त्वाची ठरेल. गांगुलीने पदभार स्वीकारल्यावर खेळाडूंमध्ये होणारा सकारात्मक बदल दिसून येईल. भारतीय क्रिकेटला जगाचा बादशाह बनवण्यात गांगुलीचा खूप मोठा वाटा होता. आता गांगुलीच भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलू शकतो”, असा विश्वास साहाने व्यक्त केला.

“आता शास्त्रींनी काय केलं?”; गांगुलीची कोपरखळी

दरम्यान, BCCI ची २३ ऑक्टोबरला होणारी वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी रविवारी विविध राज्य संघटनांची अनौपचारिक बैठक मुंबईत झाली. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. BCCI च्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची आज शेवटची मुदत होती. या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गांगुली BCCI अध्यक्षपदी यशस्वी ठरेल?, सचिन म्हणतो…

या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या अर्जांची छाननी करून वैध ठरलेल्या उमेदवारांची यादी १५ ऑक्टोबरला BCCI कडून जाहीर केली जाईल. तर १६ तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर २३ ऑक्टोबरला निवडणूक पार पडून नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात येणार आहे.