05 August 2020

News Flash

दडपणाखाली खेळणे हे अध्यक्षपदापेक्षा अवघड -गांगुली

भारताचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनीदेखील प्रशासकीय जबाबदारी तुलनेने सांभाळणे सोपे असल्याचे सांगितले.

फलंदाजी करण्यापेक्षा प्रशासकीय पद सांभाळणे हे तुलनेने सोपे आहे. कारण फलंदाजाला एका सामन्यात एकच संधी असते, याकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुलीने लक्ष वेधले. ‘‘दडपणाखाली खेळणे हे नेहमीच अवघड असते. कारण फलंदाजी करताना एकच संधी मिळत असते. या ठिकाणी बीसीसीआयचा अध्यक्ष या नात्याने जर एखादी चूक मी केली तर ती लगेचच दुरुस्त करता येऊ शकते,’’ असे गांगुलीने स्पष्ट केले.

भारताचे महान माजी फलंदाज सुनील गावस्कर यांनीदेखील प्रशासकीय जबाबदारी तुलनेने सांभाळणे सोपे असल्याचे सांगितले. ‘‘२०१४मध्ये दोन महिन्यांसाठी मी बीसीसीआयचे अध्यक्षपद सांभाळले होते. कारण त्या वेळेस सर्वोच्च न्यायालयाने माझी बीसीसीआयचा आणि आयपीएलचा अध्यक्ष म्हणून नेमणूक केली होती. अर्थातच ते काम मी सहजपणे पार पाडले,’’ असे गावस्कर यांनी स्पष्ट केले. क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये खेळाडूंच्या तंदुरुस्तीमध्ये मोठा फरक पडला आहे असेही ते म्हणाले. ‘‘आम्ही खेळायचो त्यापेक्षा आताचे खेळाडू जास्त तंदुरुस्त आहेत. ते चेंडू मोठी ताकद न लावता सहजपणे फटकावू शकतात,’’ असे गावस्कर यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2020 1:17 am

Web Title: sourav ganguly batting administrative post akp 94
Next Stories
1 राणी रामपालकडे भारतीय महिला हॉकी संघाचे नेतृत्व
2 Ind vs Aus : वॉर्नरचं धडाकेबाज शतक, सचिनचा विक्रम मोडण्यापासून केवळ दोन पावलं दूर
3 Ind vs Aus : पहिल्याच सामन्यात डेव्हिड वॉर्नरची विक्रमाला गवसणी
Just Now!
X