क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे BCCI च्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. त्यानुसार आज सौरव गांगुलीने BCCI च्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. या सोबतच सौरव गांगुलीने एक विक्रमही रचला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सौरव गांगुली भाजपाचा प. बंगालचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार असेल का?

आक्रमक नेतृत्वासाठी ओळखला जाणारा सौरव गांगुली हा BCCI चे अध्यक्षपद स्वीकारणारा भारताचा केवळ दुसरा माजी कर्णधार ठरला. महाराजकुमार हा BCCI चे अध्यक्षपद भुषवणारा पहिला माजी कर्णधार होता. १९३६ साली त्याने ३ कसोटी सामन्यांसाठी भारताचे नेतृत्व केले होते. त्यानंतर १९५४ साली त्यांनी BCCI चे अध्यक्षपद भुषवले होते. त्यानंतर तब्बल ६५ वर्षांनी हा योगायोग जुळून आला.

“आता शास्त्रींनी काय केलं?”; गांगुलीची कोपरखळी

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही आजच होणार आहे. गांगुलीसोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याने BCCI च्या सचिवपदाचा आणि BCCI चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांनी BCCI च्या कोषाध्यक्षपदाचा पराभव स्वीकारला. त्यांचीही निवड बिनविरोध झाली. सौरव गांगुली BCCI च्या अध्यक्षपदावर लोढा समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कुलिंग-ऑफ काळासाठी म्हणजेच १० महिन्यांसाठी राहू शकतो.

BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. पण या पदासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sourav ganguly bcci president becomes 2nd to hold post former indian captain vjb
First published on: 23-10-2019 at 12:46 IST