News Flash

…तर महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवणं शक्य – BCCI अध्यक्ष सौरव गांगुली

महिला खेळाडूंची संख्या वाढणं गरजेचं !

बीसीसीआयने आयोजित केलेल्या आयपीएल स्पर्धेने गेल्या काही वर्षांमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या देशांमधले अनेक खेळाडू या स्पर्धेत खेळण्यासाठी उत्सुक असतात. मध्यंतरी महिला क्रिकेटपटूंसाठी आयपीएल स्पर्धा भरवावी अशी मागणी चाहत्यांकडून होत होती. २०१९ च्या हंगामात बीसीसीआयने महिला क्रिकेटपटूंसाठी ३ प्रदर्शनीय सामन्यांचं आयोजन केलं होतं. मात्र यानंतर हा विषय पुन्हा मागे पडला. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने महिला क्रिकेट आयपीएलबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

“काही गोष्टी आपण सर्वांनी नीट समजावून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला महिलांसाठी आयपीएल स्पर्धा भरवायची असेल, तर तेवढे खेळाडू लागतात. येत्या ४ वर्षांच्या काळात हे शक्य होईल, आणि तेव्हाच महिलांसाठी ७ संघ सहभागी होतील, अशी आयपीएल स्पर्धा भरवता येईल. स्थानिक राज्य संस्थांनी आपल्या अंतर्गत खेळणाऱ्याी महिला क्रिकेटपटूंना अजुन प्रोत्साहन देण्याची गरज आहे. ज्यावेळी महिला खेळाडूंची संख्या १५०-१६० च्या घरात पोहचले त्यावेळी ही स्पर्धा भरवणं नक्कीच शक्य होईल.” India Today वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गांगुली बोलत होता.

२०२० साली खेळवण्यात येणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव १९ डिसेंबरला कोलकाता शहरात पार पडला जाणार आहे. या स्पर्धेसाठी Player Transfer Window बंद झाली असून सर्व संघमालकांनी आपल्या पसंतीच्या खेळाडूंना संघात स्थान दिलं असून इतर खेळाडूंना करारमुक्त केलं आहे. त्यामुळे १९ तारखेला कोणत्या खेळाडूवर किती रुपयांची बोली लागते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 2:13 pm

Web Title: sourav ganguly feels india needs more players before a seven team womens ipl psd 91
टॅग : Bcci,Ipl,Sourav Ganguly
Next Stories
1 मिळालेल्या संधीचं सोनं करायचं आहे, मी विश्वचषकाची काळजी करत नाही – लोकेश राहुल
2 बास्केटबॉलपटू सतनाम निलंबित!
3 दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धा : भारताचे पदकांचे द्विशतक
Just Now!
X