News Flash

World Cup 2019 : धोनीच्या जागेवर कार्तिकला फलंदाजीत बढती, दादा भडकला

संघ अडचणीत असताना अनुभवी खेळाडू मैदानात का नाही?

विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताची फलंदाजी कोलमडली. न्यूझीलंडने दिलेल्या २४० धावांचा पाठलाग करताना भारताचे ६ फलंदाज १०० धावसंख्येच्या आतच माघारी परतले. भारताच्या आघाडीच्या फळीतले ३ फलंदाज केवळ एक धाव काढून माघारी परतले. पहिले ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर धोनीने मैदानात येणं गरजेचं होतं. मात्र दिनेश कार्तिक मैदानात आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला.

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही या निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त केलं. समालोचनादरम्यान गांगुलीने भारतीय संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर टीका केली. “३ विकेट गेल्यानंतर धोनीला संधी न मिळणं ही गोष्ट खरचं अनाकलनीय आहे. ज्या क्षणी भारताला धोनीची गरज आहे, त्यावेळी तो मैदानात नाहीये. ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे. या क्षणी भारताला धोनीच्या अनुभवाची गरज होती. जेव्हा तुमचे पहिले ३-४ फलंदाज २५ धावांच्या आत माघारी परततात, त्यावेळी तुमचा अनुभवी फलंदाज मैदानात येणं अपेक्षित असतं.”

दरम्यान दिनेश कार्तिकलाही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. २५ चेंडूत अवघ्या ६ धावा काढत कार्तिक हेन्रीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. निशमने कार्तिकचा सुरेख झेल पकडला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 6:22 pm

Web Title: sourav ganguly furious as india decide to send dinesh karthik ahead of ms dhoni in semi final vs new zealand psd 91
Next Stories
1 सर जाडेजा न्यूझीलंडविरुद्धची ही खेळी आठवते का?; पुनरावृत्ती झाली तरच विजय शक्य
2 धोनी आहे तर विजय शक्य आहे, ही पाहा आकडेवारी
3 भारताचा डाव गडगडल्याने पाकिस्तानला आनंदाच्या उकळ्या, पाहा व्हायरल मिम्स
Just Now!
X