08 August 2020

News Flash

दोन आठवडय़ांचा विलगीकरणाचा काळ खेळाडूंसाठी निराशाजनक!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नियमात बदल करण्याची गांगुलीची मागणी

| July 13, 2020 01:49 am

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर नियमात बदल करण्याची गांगुलीची मागणी

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर विलगीकरण काळ हा अनिवार्य दिवसांपेक्षा कमी असावा. ऑस्ट्रेलियात जाऊन दोन आठवडे हॉटेलमध्ये खेळाडूंनी निवांत घालवणे हे निराशाजनक आहे, अशी अपेक्षा भारतीय क्रि के ट नियामक मंडळाचा (अध्यक्ष) सौरव गांगुलीने व्यक्त के ली आहे.

करोनाच्या पाश्र्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) क्रि के टमध्ये नवे नियम लागू के ले आहेत. इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात ते अमलात आले. या नियमानुसार खेळाडूंसाठी १४ दिवस अनिवार्य विलगीकरण असेल आणि सामन्यापूर्वी त्यांची करोना चाचणी घेण्यात येईल.

वर्षांच्या उत्तरार्धात ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या चार कसोटी सामन्यांच्या मालिके पैकी एक सामना प्रकाशझोतात होणार आहे. हा दीर्घकालीन दौरा सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला पुरेशी विश्रांती मिळेल, अशी आशा ४८ वर्षीय गांगुलीने व्यक्त के ली.

‘‘डिसेंबरमध्ये भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा निश्चित मानला जात आहे. फक्त विलगीकरणाचा कालावधी कमी असावा. परदेशात दोन आठवडे हॉटेलमध्ये निवांत घालवणे हे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे विलगीकरणाचा आम्ही गांभीर्याने विचार करीत आहोत, ’’ असे गांगुलीने सांगितले. ३ डिसेंबरपासून भारत-ऑस्ट्रेलिया दौऱ्याला प्रारंभ होणार आहे.

‘‘मेलबर्न वगळता ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये करोनाची साथ नियंत्रणात आहे. त्यामुळे विलगीकरणाचे दिवस कमी करायला कोणतीही हरकत नाही,’’ असे गांगुली म्हणाला. ऑस्ट्रेलियात नऊ हजारांहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली. यापैकी ७५००हून जास्त व्यक्ती बरे झाले आहेत.

कोहलीच्या कारकीर्दीसाठी महत्त्वाची मालिका!

डिसेंबपर्यंत मी अध्यक्षपदावर राहीन, याची खात्री नाही. परंतु विराट कोहली भारताच्या कर्णधारपदी नक्की असेल. ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका कोहलीच्या कारकीर्दीसाठी महत्त्वाची ठरेल, असे गांगुलीने सांगितले. गांगुली आणि सचिव जय शाह यांचा कार्यकाळ वाढावा, याकरिता ‘बीसीसीआय’ने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल के ली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 1:49 am

Web Title: sourav ganguly hoping for shorter quarantine period for team india during australia tour zws 70
Next Stories
1 ला लिगा फुटबॉल : बार्सिलोनाची चिवट झुंज सुरूच
2 मुंबईतील हॉकी रसातळाला जाण्याच्या मार्गावर!
3 स्टिरिया ग्रां. प्रि. फॉम्र्युला-वन शर्यत : हॅमिल्टनला पहिले विजेतेपद
Just Now!
X