08 August 2020

News Flash

भारताच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ एकदिवसीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी गांगुलीची धोनीला पसंती

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीत मुख्यत्वे महेंद्रसिंग धोनीची स्तुती केली व आतापर्यंतचा सर्वोत्तम 'ऑल टाईम ग्रेट' भारतीय संघ निवडला गेला

| July 9, 2013 12:01 pm

भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आपल्या वाढदिवशी दिलेल्या मुलाखतीत मुख्यत्वे महेंद्रसिंग धोनीची स्तुती केली व आतापर्यंतचा सर्वोत्तम ‘ऑल टाईम ग्रेट’ भारतीय संघ निवडला गेला तर, त्या संघाच्या कर्णधारपदासाठी महेंद्रसिंग धोनीची मी निवड करेन असेही म्हटले. सोमवारी गांगुलीने ४१व्या वर्षांत पदार्पण केले. वडिलांच्या निधनामुळे सौरवने हा वाढदिवस साजरा केला नाही, मात्र वाढदिवसानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. सौरव म्हणाला, धोनीच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. भारताच्या ‘ऑल टाईम ग्रेट’ अकरा खेळाडूंच्या संघाचे कर्णधारपदासाठी धोनीच योग्य आहे. कारण, त्याच्याकडे उत्तम फलंदाजी आणि यष्टीरक्षणाची क्षमता आहे. धोनीसारखा तडफदार फलंदाजी करणारा यष्टीरक्षक मी आतापर्यंत पाहीलेला नाही.
तसेच मी माझी पसंती सांगत असल्याने मी स्वत:ला या अकरा खेळाडूंमध्ये पाहत नाही असेही सौरव स्वत:च्या निवडीबाबत आपले विधान स्पष्ट केले.
स्वत:ची धोनीबरोबर तुलना करण्यावर दुर्लक्ष करत सौरव म्हणाला, मी तुलना करण्यावर विश्वास ठेवत नाही. खेळात खेळाडूंची तुलना करणे शक्य नसल्याचे सौरवने म्हटले 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2013 12:01 pm

Web Title: sourav ganguly picks mahendra singh dhoni to lead his all time great indian odi side
Next Stories
1 चौदा वर्षांखालील मुंबई संघाच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीतून अर्जुन तेंडुलकर बाद
2 ‘त्या’ दिवशीच्या वर्तणुकीबद्दल जडेजा आणि रैनाने मागितली माफी
3 भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदावरून मायकेल नॉब्ज यांची हकालपट्टी
Just Now!
X