बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर आज रुग्णालयात वेगवेगळया वैद्यकीय चाचण्यात करण्यात येतील. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर पुढची उपचारांची दिशा ठरवली जाईल असे रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ह्दयविकारामुळे महिन्याभरात गांगुली यांना दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची अँजिओग्राफी होऊ शकते. हृदयाजवळ आणखी एक स्टेंट बसवण्याची आवश्यकता आहे का? त्या बद्दलही डॉक्टर निर्णय घेतील. जानेवारी महिन्यात सौम्य ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर सौरव गांगुली यांच्या कोरोनरी धमनीजवळ स्टेंट बसवण्यात आला.

“रात्री सौरव गांगुली यांना शांत झोप लागली. सकाळी त्यांनी हलका ब्रेकफास्ट केला. पुढील उपचारांची दिशा ठरवण्यासाठी त्यांच्यावर आज वेगवेगळया वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील” असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले. हे डॉक्टर गांगुलींवर उपचार करणाऱ्या समितीचे सदस्य आहे. सौरव गांगुलीच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आणि उपचाराची पुढील दिशा ठरवण्यासाठी प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट देवी शेट्टी कोलकात्त्याला येऊ शकतात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सकाळी सौरव गांगुलीचा फोन करुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याची सूत्रांची माहिती आहे.